नाशिक : शहरातील विविध ठिकाणी पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी (दि.१४) केलेल्या कारवाईत सुमारे ९९२ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याक डून जवळपास दोन लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे पोलिसांनी कॉलेजरोड फूट पेट्रोलिंग करीत कोटपाअंतर्गत कारवाई करीत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांनाही पोलिसांनी दणका दिला.शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक शाखने गुरुवारी कारवाई करीत हेल्मेटविना दुचाकी वाहन चालविण्याऱ्यांसोबतच हेल्मेट न वापरणाºया व वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहनचालकांवर कारवाई करीत तब्बल दोन लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी कॉलेजरोड, गंगापूररोड, इंदिरानगर, त्र्यंबकरोडसह शहरातील विविध प्रमुख भागांत कारवाई करीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांना दंड आकारून त्यांच्यावर कारवाई केली. यात हेल्मेटशिवाय दुचाकी वाहन चालविणाºया वाहनचालकांचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे सिट बेल्टशिवाय वाहन चालविणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले. पोलिसांनी केवळ नियम मोडणाºया वाहनचालकांपर्यंत सीमित न राहता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºया ४५, तर सार्वजनिक शांततेचा भंग करणाºया ५० टवाळखोरांवरही कारवाई केली. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे उपायुक्त, सहायक उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २० ते २५ पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकासंह कर्मचाºयांसह शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कारवार्ई केली.दरम्यान, पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून गुन्हेगारांच्या हजेरीबाबत आदेश दिले असून, आयुक्त स्वत: पोलीस ठाण्यांना भेटी देणार आहेत.गंगापूररोडला तरुण पोलिसांच्या ताब्यातगंगापूररोडरोड परिसरात एका तरुणाने आपली आई आजारी असून, रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. तिच्याकडेच घाई गडबडीने जात असल्याने हेल्मेटसोबत आणण्यास विसरल्याचे सांगत पोलिसांच्या कारवाईतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस बेशिस्त वाहतुकीसोबतच परिसरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºयांवर कारवाई करीत असताना हाच तरुण पोलिसांना स्नुकर क्लबमध्ये स्नुकर खेळताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत समज दिली.
एक हजार वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:29 IST
शहरातील विविध ठिकाणी पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी (दि.१४) केलेल्या कारवाईत सुमारे ९९२ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याक डून जवळपास दोन लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
एक हजार वाहनचालकांवर कारवाई
ठळक मुद्देधूम्रपान करणाऱ्यांनाही दणकावाहतूक शाखेकडून सव्वादोन लाखांचा दंडवसूल