निळवंडी सरपंच अपात्र ग्रामसेवकावरही कारवाई?
By Admin | Updated: January 2, 2015 00:22 IST2015-01-02T00:22:43+5:302015-01-02T00:22:57+5:30
निळवंडी सरपंच अपात्र ग्रामसेवकावरही कारवाई?

निळवंडी सरपंच अपात्र ग्रामसेवकावरही कारवाई?
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच उज्वला यादव डंबाळे यांनी सासरे खंडेराव मुरलीधर डंबाळे यांचे नावे धनादेश व रोख रक्कम देवून पदाचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाल्याने मुंबई ग्रा,प.अधिनियम 14 व 16 नुसार त्यांना नाशिक येथील अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या कोर्टाने अपात्र ठरविले आहे.
निळवंडी ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच व उपसरपंचांनी ग्रामपंचायत कामकाजात कुटुंबियांना सहभागी करून हस्तक्षेप वाढविल्याने व आर्थिक अपहार सुरु केल्याने ग्रा.प.सदस्य गजीराम घुटे ,शारदा पाटील ,सुनील गवारी ,मंदाबाई वाघ ,हौसाबाई गांगोडे यांनी न्यायालयात धाव घेवून कार्यवाहीची मागणी केली होती.अर्जदारामार्फात अड.मनीष बस्ते,अड.रवींद्र पवार ,अड,विनोद शेलार यांनी बाजू मांडली.तर सरपंच व ग्रामसेवकांच्या वतीने अड.गुळवे यांनी काम पिहले.न्यायालयाने अर्जदार,सामनेवाले ,ग्रामसेवक व गटविकास अधिकारी दिंडोरी यांचे व बँक कागदपत्रे अवलोकन केले.त्यात सरपंच उज्वला डंबाळे यांनी कुटुंबियांच्या नावे चेक व रोख
रकमा दिल्याचे स्पष्ट झाल्याने व कुटुंबाचा आर्थिक फायदा
केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना वरीलप्रमाणे अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या कोर्टाने अपात्र ठरविले आहे.
उपसरपंच यापूर्वीच अपात्र झाले असून ग्रामसेवक गावित यांचेवर कार्यवाई करण्यासाठी आयुक्त व सी.ई.ओ.कडे प्रस्तावित करण्यात येणार आहे.