कारवाई बासनात : रिक्षाचालकांकडून बेशिस्त वाहतूक सुरूच; पोलिसांचे दुर्लक्ष वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:42 IST2018-04-02T00:42:13+5:302018-04-02T00:42:13+5:30

पंचवटी : वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने चालकांना पोलिसांचे कोणतेही भय नसल्याचेच दिसून येते.

Action: Incessant traffic from rickshaw pullers continues; Neglect of police traffic rules | कारवाई बासनात : रिक्षाचालकांकडून बेशिस्त वाहतूक सुरूच; पोलिसांचे दुर्लक्ष वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

कारवाई बासनात : रिक्षाचालकांकडून बेशिस्त वाहतूक सुरूच; पोलिसांचे दुर्लक्ष वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

ठळक मुद्देरिक्षाचालकांची मुजोरी वाढत असल्याची तक्रार वाहनचालकांकडे हेल्मेट, कागदपत्रे नाहीत

पंचवटी : वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने चालकांना पोलिसांचे कोणतेही भय नसल्याचेच दिसून येते. शहरातील सर्वच मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून तर काही रिक्षाचालक परराज्यातून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून अव्वाच्या सव्वा भाडेवसुली करून सर्रासपणे आर्थिक लूट करीत असल्याचे दिसून येते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेकडून नियमितपणे कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरातील रविवार कारंजा, नवीन आडगाव नाका, दिंडोरीरोड, पेठरोड यांसह अन्य वाहतूक मार्गावर रिक्षाचालक चालकाच्या आसनाशेजारी दोन व मागील सिटवर पाच ते सहा प्रवासी कोंबून वाहतूक करीत असल्याचे चित्र दिसून येते. दुचाकीवरून जाणाºया वाहनचालकांकडे हेल्मेट, कागदपत्रे नाहीत तसेच अन्य कारणावरून सर्वसामान्य वाहनधारकांना वेठीस धरणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी नियममोडणाºया रिक्षाचालकांकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.

Web Title: Action: Incessant traffic from rickshaw pullers continues; Neglect of police traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.