नाशिक : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या चार अंगणवाडी पर्यवेक्षकांवर गंभीर स्वरूपाच्या तक्रारींमुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास सेवेतून बडतर्फकरण्याचा इशाराही डॉ. गिते यांनी दिला आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या कामावर देखरेख करण्यासाठी प्रकल्प स्तरावर अंगणवाडी पर्यवेक्षक कार्यरत आहेत; मात्र बागलाण-२, सिन्नर-२, त्र्यंबकेश्वर व पेठ प्रकल्पातील ४ पर्यवेक्षकांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. बागलाण प्रकल्पातील कमल सुरंजे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघाने लेखी तक्र ार दिली होती. यात अमृत आहार योजेनेंतर्गत अंगणवाडी सेविकांकडून रक्कम जमा करणे, अपमानास्पद वागणूक देणे आदी आरोप करण्यात आले होते. तसेच सिन्नर प्रकल्पातील आशा सावंत यांच्या विरुद्धही अशाच स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी वेळोवेळी नोटीसदेखील बजाविण्यात आल्या होत्या. प्राथमिक चौकशीत तक्रारीत तथ्य आढळल्याने दोघा पर्यवेक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ अंतर्गत नियम ३ चा भंग केल्या प्रकरणी दोषारोप पत्र बजावण्यात आले आहे.दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील संगीता ठाकूर यांच्याविरु द्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून, त्यांचे प्रकरण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे चौकशीसाठी देण्यात आले आहे. पेठ येथील मीना ठाकूर यांची एक वेतनवाढ बंद करण्यात आली आहे.
चार अंगणवाडी पर्यवेक्षकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:31 IST
नाशिक : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या चार अंगणवाडी पर्यवेक्षकांवर गंभीर स्वरूपाच्या तक्रारींमुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास सेवेतून बडतर्फकरण्याचा इशाराही डॉ. गिते यांनी दिला आहे.
चार अंगणवाडी पर्यवेक्षकांवर कारवाई
ठळक मुद्देजिल्हा परिषद : सेवेतून बडतर्फीची टांगती तलवार