पाच सराईतांवर तडीपारीची कारवाई
By Admin | Updated: February 17, 2017 00:33 IST2017-02-17T00:31:49+5:302017-02-17T00:33:44+5:30
पाच सराईतांवर तडीपारीची कारवाई

पाच सराईतांवर तडीपारीची कारवाई
नाशिक : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे़ शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमधील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या यामध्ये समावेश
आहे़
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील संशयित नाना निवृत्ती बिन्नीवाले (२५, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉलरोड, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक) व गुड्ड्या ऊर्फ अर्जुन रुंजा पवार (२५, रा. वडारवाडी, देवळालीगाव) या दोघांना प्रत्येकी एक वर्षे, अंबड पोलिसांनी संशयित संदेश सूर्यकांत काजळे (२६, रा. फ्लॅट नं. ५, अक्षरधाम अपार्टमेंट, पेठरोड, पंचवटी) यास तीन महिने, इंदिरानगर पोलिसांनी सोनू ऊर्फ समीर निजाम शेख (२२, रा. वडाळागाव) यास एक वर्षासाठी, तर किरण अशोक खंबाईत (१९, रा. भारतनगर) यास सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.