तीन महिन्यांत अठराशे नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST2021-05-20T04:15:23+5:302021-05-20T04:15:23+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या विविध निर्बंधांची अंमलबजावणी करत असताना पोलिसांनी या नियमांचे उल्लंघन ...

Action on eighteen hundred citizens in three months | तीन महिन्यांत अठराशे नागरिकांवर कारवाई

तीन महिन्यांत अठराशे नागरिकांवर कारवाई

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या विविध निर्बंधांची अंमलबजावणी करत असताना पोलिसांनी या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह दंडुक्याचा प्रसाद दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली १ मार्च ते १७ मे दरम्यान वडाळा गावातील मुख्य चौफुली, पाथर्डी फाटा, कलानगर चौक या तीन ठिकाणी नाकाबंदी करत कारवाई करण्यात येत होती. मुख्य व अंतर्गत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे , सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांच्या मालकांविरुद्ध तसेच संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, राकेश भामरे, व उपनिरीक्षक सतीश जगदाळेसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Action on eighteen hundred citizens in three months