प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: June 19, 2014 00:55 IST2014-06-19T00:20:37+5:302014-06-19T00:55:31+5:30
नाशिक : पंचवटी योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या चारचाकी व अवजड वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे.

प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांवर कारवाई
नाशिक : पंचवटी योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या चारचाकी व अवजड वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. वायुवेग व भरारी पथकाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान ४० वाहने मुदतबाह्य आढळून आली. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या तपासणी मोहिमेत प्रवासी वाहने, मालवाहू वाहने, काळ्या पिवळ्या प्रवासी जीप, टेम्पो अशा प्रकारच्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात मुदत संपलेली जवळपास ४० वाहने दोषी आढळून आल्याने कारवाई करून वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच दोषी आढळलेल्या संबंधित वाहनांच्या चालकांकडून जवळपास एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग व भरारी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली असून, संपूर्ण जिल्हाभरात ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.