हेल्मेट प्रकरणी कारवाई सुरूच
By Admin | Updated: November 1, 2015 21:54 IST2015-11-01T21:53:03+5:302015-11-01T21:54:53+5:30
चार दिवसांत सव्वापाचशे वाहनधारकांवर कारवाई

हेल्मेट प्रकरणी कारवाई सुरूच
हेल्मेट प्रकरणी
कारवाई सुरूचचार दिवसांत सव्वापाचशे वाहनधारकांवर कारवाईपंचवटी : सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकी वाहन चालविताना स्वरक्षणासाठी हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असून, न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या सव्वापाचशे वाहनधारकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
वाहन चालविताना वाहनधारक डोक्यावर हेल्मेट परिधान करत नाही. त्यातच अपघात झाल्यास दुचाकीधारक वाहनावरून पडल्यास डोक्याला मार लागून गंभीर जखमी होतो व त्यात त्याचा जीव जाण्याची शक्यता असते. वाहनधारकाने डोक्यावर हेल्मेट परिधान केले व अपघात झाल्यास डोक्याला गंभीर इजा होत नाही, त्यामुळे अपघातग्रस्त वाहनधारकाचे प्राण बचावतात. हेल्मेट परिधान न केल्याने वाहन चालविणे असुरक्षित असून, वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा, याबाबत सर्वाेच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आदेश पारित केले होते. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने सोमवार (दि.२६)पासून जे वाहनधारक दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट, तर चारचाकी चालविताना सीट बेल्टचा वापर करणार नाही अशा वाहनधारकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनधारकांवर दंडापाठोपाठ त्यांना दोन तास प्रादेशिक परिवहन कार्यालयात बोलावून समुपदेशन केले जात आहे. वाहनधारकांनी कारवाई टाळण्यासाठी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. (वार्ताहर)
कारवाई सुरूच ठेवणार
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट, तर चारचाकी वाहनधारकांनी वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून शहरातील मुख्य रस्त्यावर वायूवेग पथक नेमण्यात आले असून, नागरिकांना शिस्त लागत नाही तोपर्यंत कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.