शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही शिक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:30 IST

शहरातील आनंदवली परिसरातील काळेनगर येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा खुलासा शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केला असून, यासंदर्भात शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे.

नाशिक : शहरातील आनंदवली परिसरातील काळेनगर येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा खुलासा शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केला असून, यासंदर्भात शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे.गेल्या ३१ जुलै रोजी ही घटना घडली होती. महापालिकेच्या काळेनगर येथील शाळेतील विद्यार्थी अक्षय साठे हा लघुशंकेसाठी बाहेर गेला. याठिकाणी एका घराचे बांधकाम सुरू होते. यामुळे खड्डे खोदून ठेवण्यात आले होते त्यात बुडून अक्षय या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.महापालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीदेखील केली होती. त्यानुसार महापालिकेने शाळेचे मुख्याध्यापक कैलास ठाकरे तसेच शिक्षिका मंदा महारू बागुल यांना नोटिसा बजावून त्यांचा खुलासा मागवला होता. आता या शिक्षकांनी सादर केलेले खुलासे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना प्राप्त झाले आहेत. तथापि, शिक्षण मंडळाने ते अमान्य केले आहेत. कैलास ठाकरे यांनी, शाळा खूप मोठी असल्याने सर्वच ठिकाणी नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे खुलाशात नमूद केले आहे. तर शिक्षिकेने सदरचा मुलगा लघुशंकेसाठी वर्गाबाहेर पडल्याचे नमूद केले असले तरी मुळातच शाळेत प्रसाधनगृह असताना मुलगा बाहेर लघुशंकेसाठी शाळाबाहेर कसा काय पडू शकेल? असा प्रश्न मनपाच्या शिक्षण विभागाला पडला आहे. त्यामुळे त्यांचा खुलासादेखील अमान्य करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.यासंदर्भातील प्रस्ताव आता पुढील कार्यवाहीसाठी लेखापरीक्षकांकडे देण्यात आला असून, चौकशीची पुढील कायवाही होणार आहे. मुलगा शाळेत आल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी शाळेची असते. त्यामुळे महापालिकेने हे सर्व प्रकरण गांभीर्याने घेतले असल्याचे देवीदास महाजन यांनी सांगितले.शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल सुपूर्दशहरातील गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमधील सातवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भातील अहवाल संबंधित शाळेने महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द केला आहे. हा अहवाल शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या शाळेत सातवीच्या वर्गात ठेवलेले कपाट पडून त्याखाली दबून एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात, मनपाच्या शिक्षण प्रशासनाने अहवाल मागवला होता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळाTeacherशिक्षक