पांडवलेणीजवळ वॉकिंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:13 IST2021-04-26T04:13:39+5:302021-04-26T04:13:39+5:30

कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. विनाकारण नागरिकांनी ...

Action against those walking near Pandavaleni | पांडवलेणीजवळ वॉकिंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

पांडवलेणीजवळ वॉकिंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. विनाकारण नागरिकांनी फिरू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे तरीही काही नागरिक फेरफटका मारायला येत आहेत. त्याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. २५) रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पांडवलेणी येथे फेरफटका करण्यासाठी आलेल्या चार नागरिकांवर प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे एकूण चार हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच सकाळी व सायंकाळी जॉगिंग ट्रॅक, गजानन महाराज मार्ग, कलानगर ते पाथर्डीगाव, वडाळा पाथर्डी रस्ता, श्रीकृष्ण चौक ते राणेनगर चौफुली, पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटासह परिसरातील अंतर्गत रस्त्यावर विनाकरण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Action against those walking near Pandavaleni