पंचवटीत तडीपार गुंडांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST2021-09-10T04:20:30+5:302021-09-10T04:20:30+5:30
गणेश तानाजी दातीर (२८) मायको दवाखान्याजवळ कालिकानगर, दिंडोरी रोड) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला ...

पंचवटीत तडीपार गुंडांवर कारवाई
गणेश तानाजी दातीर (२८) मायको दवाखान्याजवळ कालिकानगर, दिंडोरी रोड) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला २०१९ मध्ये दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. दातीर याने मात्र मुदतीपूर्वीच कोणाची परवानगी न घेता घरी येऊन वास्तव्य करत असल्याचे समजताच पंचवटी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
तर गणेश झुंबर आहेर (२४) फुलेनगर, पेठरोड याच्याविरुद्ध देखील पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न सागर गणपत बोडके त्याच्यावर देखील विविध गुन्हे दाखल असलेल या दोघांना तडीपार करण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाची कोणत्या प्रकारची परवानगी न घेता आहेर व बोडके पंचवटी हद्दीत बिनधास्तपणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे.