शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांवरील कारवाई पोलिसांचीच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 02:21 IST

अवैध धंदे रोखणे ही  पोलिसांची  जबाबदारी नव्हे तर महसूल विभागाने  कारवाई करावी, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतल्याने दोन खात्यांमधील अधिकार आणि कारवाईचा प्रश्न थेट उपमुख्यमंत्री तसेच सचिवांपर्यंत पोहोचला. नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेमधील हा बेबनाव खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगत विभागीय आयुक्तांना तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बैठकीत अवैध धंद्यांवरील कारवाई पोलिसांचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

ठळक मुद्देवादावर पडदा : उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने झालेल्या बैठकीत तोडगा

नाशिक : अवैध धंदे रोखणे ही  पोलिसांची  जबाबदारी नव्हे तर महसूल विभागाने  कारवाई करावी, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतल्याने दोन खात्यांमधील अधिकार आणि कारवाईचा प्रश्न थेट उपमुख्यमंत्री तसेच सचिवांपर्यंत पोहोचला. नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेमधील हा बेबनाव खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगत विभागीय आयुक्तांना तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बैठकीत अवैध धंद्यांवरील कारवाई पोलिसांचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी बोट क्लब येथे झालेल्या बैठकीत  पोलीस विभागाने अवैध धंद्यांवरील कारवाई प्रचलित पद्धतीनुसारच  करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या निर्देशांच्या अंमलबजावणीसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात   बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.विभागातील सर्व जिल्ह्यांत विविध विभागांना त्यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई करावयाची असल्यास त्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत पुरेसे पोलीस बळ उपलब्ध करून दिले जाईल, असे   विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. पोलीस विभागाने स्वयंस्फूर्तीने कारवाई केल्यास त्याचा मोठा प्रभाव अवैध धंद्यांवर अटकाव घालण्यासाठी होतो, असे पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांनी नमूद केले.  यावेळी बोलताना विभागीय आयुक्त   गमे म्हणाले, साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा यासंदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होते आहे किंवा नाही  याबाबत दक्षता पोलीस विभागाकडून घेतली जाईल  व त्याचे उल्लंघन केले गेले असल्यास कारवाई पोलीस विभाग करेल. त्यासाठी कोणाच्याही तक्रारीची आवश्यकता असणार नाही.सरकारी वकिलांचाही सल्लापोलीस विभागास कोणत्याही अवैध बाबी अथवा सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेल्या अधिसूचनांचे उल्लंघन दिसून आल्यास थेट कारवाई करण्याचे अधिकार विविध फौजदारी कायद्याअंतर्गत असल्याची बाब जिल्हा सरकारी वकील   अजय मिसर यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली. यापूर्वी पोलीस विभागानेच स्वयंस्फूर्तीने अशा प्रकरणांमध्ये कारवाई केलेली असून, अशी अनेक प्रकरणे सद्य:स्थितीत न्यायप्रविष्ट आहेत. पोलीस यंत्रणेने अधिकाराबाबत संभ्रम निर्माण केल्यास त्याचा   प्रतिकूल परिणाम   न्यायप्रविष्ट प्रकरणांवर होईल असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले.फरांदे यांनीही केली होती तक्रारपोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असल्याचे जाहीर केल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबतचे स्पष्टीकरण व्हावे असे पत्र आमदार देवयानी फरांदे यांनी गृहविभाग तसेच गृहमंत्र्यांना दिले होते. उपमुख्यमंत्र्यांकडेही काही अधिकाऱ्यांनी याबाबतच्या तक्रारी केल्या होत्या.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAjit Pawarअजित पवारDevyani Farandeदेवयानी फरांदे