अवैध दारूविरोधात धडक कारवाई
By Admin | Updated: July 8, 2017 00:17 IST2017-07-08T00:16:22+5:302017-07-08T00:17:04+5:30
जायखेडा : पोलिसांनी अवैध गावठी दारूविरोधात पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करीत हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.

अवैध दारूविरोधात धडक कारवाई
जायखेडा : पोलिसांनी अवैध गावठी दारूविरोधात पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करीत वायगाव, देवळाणे व अंबासन परिसारतील हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या धडक कारवाईत सुमारे वीस ते पंचवीस हजारांचे दारू बनविण्याचे रसायन नष्ट करण्यात येऊन तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक भागांत छुप्या पद्धतीने अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या वाढल्याने या व्यवसायाचा बिमोड करण्यासाठी जायखेडा पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी कठोर पाऊल उचलत जायखेडा पोलीस ठाणे व नामपूर आउट पोस्टच्या पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पथके तयार केली आहेत. पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दोन्ही पथके छापे टाकून धडक कारवाई करणार आहेत.