अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST2021-05-29T04:12:52+5:302021-05-29T04:12:52+5:30

त्यांच्याकडून १११ देशी दारूच्या बाटल्या जप्त करून ६६६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. लॉकडाऊन ...

Action against illegal drug dealers | अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई

अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई

त्यांच्याकडून १११ देशी दारूच्या बाटल्या जप्त करून ६६६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लासलगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारूची विक्री सुरू होती. याबाबत अनेक तक्रारी दाखल होऊनही स्थानिक पोलीस प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते. लासलगाव शहरात अवैध दारू विक्रीचे अड्डे जोरात सुरू असल्याने गुरुवारी सायंकाळी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लासलगाव व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या कारवाईनंतर शुक्रवारी स्थानिक पोलिसांनीदेखील या अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणारे विरुद्ध अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Action against illegal drug dealers