शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

कर्मचाऱ्यांवरील कारवाई; गमे-बडगुजर यांच्यात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:31 PM

कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाºयावरील कारवाईबाबत अपिलीय अधिकार महापालिकेच्या स्थायी समितीला असतात. परंतु आयुक्त त्यावर सोयीने अंमल करीत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य सुधाकर बडगुजर यांनी केला. आयुक्त गमे हे दादागिरी करीत असल्याचा आरोप करीत बडगुजर यांनी लोकप्रतिनिधी काय जेवायला महापालिकेत येतात का? असा प्रश्न केल्याने नूतन समितीच्या पहिल्याच बैठकीत वातावरण तापले. तथापि, गमे यांनीदेखील स्पष्टीकरण देताना समितीला योग्य वाटतील असेच ठराव करावेत, प्रशासन त्याची योग्य ती दखल घेईल, असे सांगितले.

ठळक मुद्देस्थायी समिती : अधिकार क्षेत्र, अंमलबजावणीवरून ठिणगी

नाशिक : कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाºयावरील कारवाईबाबत अपिलीय अधिकार महापालिकेच्या स्थायी समितीला असतात. परंतु आयुक्त त्यावर सोयीने अंमल करीत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य सुधाकर बडगुजर यांनी केला. आयुक्त गमे हे दादागिरी करीत असल्याचा आरोप करीत बडगुजर यांनी लोकप्रतिनिधी काय जेवायला महापालिकेत येतात का? असा प्रश्न केल्याने नूतन समितीच्या पहिल्याच बैठकीत वातावरण तापले. तथापि, गमे यांनीदेखील स्पष्टीकरण देताना समितीला योग्य वाटतील असेच ठराव करावेत, प्रशासन त्याची योग्य ती दखल घेईल, असे सांगितले.समितीची बैठक सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.१९) पार पडली यावेळी हा वाद झाला. दीडशेहून अधिक दिवस विनापरवानगी गैरहजर राहणाºया कामाठ्याला कामावर घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता, तर महापालिकेने एका शिफ्ट इंजिनिअरला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याने त्यावर त्या अभियंत्याने अपील केले होते. त्याची बाजू बडगुजर मांडत असताना हा प्रकार घडला. यापूर्वी देवीदास सकट या एका कर्मचाºयाला क्षमापीत करून कामावर घेण्याचा निर्णय समितीने घेतला, परंतु आयुक्तांनी त्यावर कोणत्याही प्रकारचा अंमल केला नाही, असा बडगुजर यांचा आरोप होता. प्रशासन उपआयुक्तांशी ते प्रश्नोत्तरे करीत असतानाच आयुक्तांनी अशाप्रकारे काय बरोबर वाटते ते विचारणे अयोग्य आहे, असे सांगितले. त्यावर बडगुजर यांनी संताप व्यक्तत करीत आपल्याला मनपात तीस वर्ष झाले आहेत. आपल्याला मनपाचे कामकाज चांगलेच माहिती आहे, फार खोलात जाऊ देऊ नका, असा इशारा दिला. अशोक मुर्तडक यांनी कारवाई करताना प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे सांगितले.भूसंपादनासाठी सादर करण्यात आलेले नऊ प्रस्ताव रद्द करण्यावरून बडगुजर आणि सभापती गणेश गिते यांच्यात खटके उडाले. एकीकडे जागा मालकाला टीडीआर स्वरूपात मोबदला दिला आणि दुसरीकडे मात्र जे आता तेथे आरक्षण नसल्याने भूसंपादन प्रक्रिया रद्द करावी, असे प्रशासन नमूद करते यावरून बडगुजर हे नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजू आहेर यांना कोंडीत पकडले. मात्र, त्याचवेळी सभापतींनी पुढील सभेत माहितीसह हा विषय घेऊ, असे सांगितल्याने बडगुजर यांनी अशाप्रकारे अधिकाऱ्यांना पाठीशी घालून कामकाज चालणार नाही, असा इशारा दिला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRadhakrishna Gameराधाकृष्ण गमे