१८ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:22 IST2017-09-22T00:21:20+5:302017-09-22T00:22:02+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत खातेचौकशीत दोषी आढळलेल्या तब्बल दीड डझन कर्मचाºयांवर प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या आदेशाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

१८ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत खातेचौकशीत दोषी आढळलेल्या तब्बल दीड डझन कर्मचाºयांवर प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या आदेशाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाºयांमध्ये सर्वाधिक सहा कर्मचारी पेठ तालुक्यातील आहेत. खाते चौकशीत दोषी आढळलेल्या १८ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यातील पाच जणांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यात अरुण भगवान चव्हाण, लक्ष्मण नवसू खाडम व जगन्नाथ सुपडू घुणावंत (सर्व.पेठ), तसेच चंदर उखा चौधरी (सुरगाणा) व संजय सीताराम जाधव (नांदगाव) या पाच जणांचा समावेश आहे. सहा जणांची वेतनवाढ बंद करण्यात आली आहे. त्यात हिरामण रामदास बैरागी, जिभाऊ पंडित सोनजे, मंगला पुरुषोत्तम गवळी (पेठ), मिलिंद प्रल्हाद गांगुर्डे, मधुकर गंभीर अहिरे (इगतपुरी), नाना वसंत गोगावणे (निफाड), दिनकर आधार पवार (दिंडोरी) यांचा समावेश आहे, तर अनुरेखा रमेश साळवे (नाशिक) यांना मूळ वेतनावर आणण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच जगन्नाथ लकडू चव्हाण यांचे सेवानिवृत्ती वेतन कायमस्वरूपी ५ टक्के कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे.