उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर कारवाई
By Admin | Updated: November 10, 2015 23:33 IST2015-11-10T23:33:02+5:302015-11-10T23:33:02+5:30
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर कारवाई

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर कारवाई
नाशिक : अनधिकृत फटाके विक्रीसंदर्भात उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना आदेशित केल्यानंतर अखेरीस ही कारवाई करण्यात आली. नाशिकमधील चंद्रकांत लासूरे या युवा कार्यकर्त्याने यासंदर्भात याचिका दाखल केली होती.
नाशिकमधील अनधिकृत फटाके विक्री, तसेच क्षमतेपेक्षा अधिक फटाक्यांचा साठा या विषयावर लासूरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच लोकआयुक्तांकडेही तक्रार केली होती. लोकआयुक्तांनीही पोलिसांना जाब विचारला, तसेच उच्च न्यायालयाने तातडीने तपासणीचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले. त्या आधारे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कळविले आणि त्यानंतर भद्रकाली पोलिसांनी तातडीने अनधिकृत फटाके शोध मोहीम राबविली. पोलिसांनी अगोदरच ही मोहीम राबविली असती, तर न्यायालयात जाण्याची गरज पडली नसती, असे लासूरे यांनी सांगितले.