५४ गुन्हेगारांवर कोम्बिंगमध्ये कारवाई

By Admin | Updated: June 27, 2016 00:22 IST2016-06-27T00:06:30+5:302016-06-27T00:22:55+5:30

५४ गुन्हेगारांवर कोम्बिंगमध्ये कारवाई

Action on 54 criminals in Coimbatore | ५४ गुन्हेगारांवर कोम्बिंगमध्ये कारवाई

५४ गुन्हेगारांवर कोम्बिंगमध्ये कारवाई

नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी आयुक्तालय हद्दीत मोठ्या संख्येने कोम्बिंग व आॅलआउट मोहीम सुरू केली आहे़
शहरातील १३ पोलीस ठाण्यांतर्गत या मोहीम राबविल्या जात असून, यामध्ये ५४ सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत़ याबरोबरच नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड या परिसरातील आठ तडीपारांचाही पोलिसांनी शोध घेतला असून, नव्याने गुन्हेगारीकडे वळालेल्या टोळीतील सदस्यांवरही कारवाई सुरू केली आहे़ सर्व पोलीस ठाण्यांतर्गत असलेली संवेदनशील ठिकाणे, टवाळखोरांचे अड्डे याठिकाणी छापे टाकून कारवाई केली जाते आहे़ पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये ८२ सराईत गुन्हेगारांची नोंद असून, त्यापैकी ५४ गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे़
पोलिसांनी आयुक्तालयात शनिवारी राबविलेल्या कोम्बिंगमध्ये नऊ गुन्हेगार सापडले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे़ दरम्यान, पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नाकाबंदी, वाहन तपासणी सुरू केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Action on 54 criminals in Coimbatore