सहायक धर्मदाय आयुक्तांसह ३८ मद्यपींवर कारवाई

By Admin | Updated: October 1, 2016 01:23 IST2016-10-01T01:22:35+5:302016-10-01T01:23:27+5:30

सहायक धर्मदाय आयुक्तांसह ३८ मद्यपींवर कारवाई

Action on 38 alcoholics, including assistant charitable commissioners | सहायक धर्मदाय आयुक्तांसह ३८ मद्यपींवर कारवाई

सहायक धर्मदाय आयुक्तांसह ३८ मद्यपींवर कारवाई

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी रात्री राबविलेल्या मोहिमेदरम्यान पाथर्डी परिसरातील एका हॉटेलवर छापा मारण्यात आला. यावेळी प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक धर्मदाय आयुक्तांसह ३८ मद्यपी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाथर्डी रस्त्यावरील साईकिरण या हॉटेलमधून विनापरवाना मद्यविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या पथकाने या हॉटेलवर गुरुवारी (दि.२९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा मारला.
यावेळी हॉटेलमध्ये सुमारे चाळीस लोक मद्यप्राशन करताना आढळून आले. या सर्व मद्यपींची पोलिसांनी अंगझडती घेत त्यांची नावे, पत्ते नोंदवून घेतली आणि मुंबई पोलीस अधिनियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक धर्मदाय आयुक्त मनोज वैजनाथ टोकाळे (३८) यांच्यासह ३८ मद्यपींवर कारवाई करण्यात आल्याचे धिवरे यांनी सांगितले.

Web Title: Action on 38 alcoholics, including assistant charitable commissioners