शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

एक एकरात ३६ टन टरबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:44 IST

परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत डांगसौंदाणे परिसरातील तरुण शेतकरी वर्गाने शेतीमध्ये बदल करीत टरबूज व खरबूज या पिकांवर आपले लक्ष केंद्रित करून दोन वर्षांपासून भरघोस उत्पन्न घेत चांगली आर्थिक प्रगती साधली आहे.

योगेश बोरसेपरंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत डांगसौंदाणे परिसरातील तरुण शेतकरी वर्गाने शेतीमध्ये बदल करीत टरबूज व खरबूज या पिकांवर आपले लक्ष केंद्रित करून दोन वर्षांपासून भरघोस उत्पन्न घेत चांगली आर्थिक प्रगती साधली आहे.पारंपरिक पिके घेऊन आर्थिक उत्पन्न टिकवून ठेवणे हे शेतकरी वर्गाचे गणित असते. मात्र आजच्या तरुणाईला ही गणिते न पटणारी आहेत. शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात दिसून येत आहे. येथील तरुण शेतकरी महेश सोनवणे यांनी गतवर्षी आपल्या दोन-तीन मित्रांना बरोबर घेऊन तीन एकरात टरबूज या पिकाची लागवड केली. मॅक्स जातीच्या टरबूज पिकाचे तीन एकरात एकरी ३६ टन उत्पन्न घेऊन परिसरातील शेतकरी वर्गासमोर त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.  या भागात प्रामुख्याने कांदा, गहू, मिरची, ऊस, मका ही पारंपरिक पिके घेण्यावरच शेतकरी वर्गाचा कल असतो; मात्र सोनवणे यांनी आपल्या मित्रांच्या साथीने टरबुजाची लागवड करीत भरघोस उत्पन्न घेतले. त्यांनी सहा बाय दीड फूट अंतरावर सरी तयार करून त्यावर ड्रीप, मल्चिंग पेपर, शेणखत टाकून पूर्वतयारी केल्यानंतर त्यावर उच्चप्रतीच्या टरबुजाची लागवड केली. सर्व तयारी करीत असताना त्यांनी रासायनिक खताचा अतिरेक टाळून सेंद्रिय खताला प्राधान्य दिले. तसेच कीटकनाशकांचा वापर न करता जैविक औषधांचा वापर केला. यामुळे खर्चात जवळजवळ ४० टक्यांनी बचत झाल्याचे ते सांगतात. गतवर्षी त्यांनी केलेल्या प्रयोगाने प्रभावित होत चालू वर्षी महेश सोनवणे, राजेंद्र परदेशी, रवींद्र बोरसे, जगदीश बोरसे, अंबादास सोनवणे, विजय सोनवणे, रोहित अहिरे, रवींद्र मोरे आदी शेतकºयांनी जवळजवळ ३० ते ३२ एकरात टरबूज व खरबूज या पिकांची लागवड केली आहे. पारंपरिक पिकांना दरवेळी चांगला बाजारभाव मिळेलच असे नाही, त्यामुळे  आता बळीराजाकडून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग केल्याने आर्थिक नियोजनही चांगले होत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी