एक एकर शेतीत आधुनिक पद्धतीने साकारले रेशीम पीक
By Admin | Updated: September 22, 2016 00:11 IST2016-09-22T00:09:46+5:302016-09-22T00:11:01+5:30
यशस्वी प्रयोग : बेलगाव कुऱ्हेच्या शेतकऱ्याच्या मेहनतीला फळ; विक्रीसाठी बंगळुरूला रवाना

एक एकर शेतीत आधुनिक पद्धतीने साकारले रेशीम पीक
लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हे
येथील शेतकरी राजाराम बाळू गुळवे यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत एक एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. पिकवलेला रेशीमचा पाला हा अळ्यांचे खाद्य असून, त्यांनी यासाठी शेडनेट उभे केले आहे.
साधारण बावीस दिवसात अळ्या तयार होतात. त्यांची रेशीम बंगळुरू येथे विक्रीसाठी जात असून, यातून त्यांना दररोज चांगले उत्पन्न मिळत आहे.
बेलगाव कुऱ्हेचे आदर्श शिक्षक विष्णू बोराडे यांनी रेशीम शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले असून, ते शेतीबद्दल उपयुक्त मार्गदर्शन त्यांना करत आहेत. या रेशीम पीक प्रयोगामुळे गुळवे यांना विक्रमी उत्पादन मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. शेतीविषयक अभ्यास करून ते या शेतीची विशेष
काळजी घेत त्यांनी निसर्गाच्या चहूबाजूने येणाऱ्या संकटावर मात केली आहे.
नवीन प्रयोगात त्यांची पत्नी सिंधूबाई, आई चंद्रभागाबाई, मुलगी कोमलदेखील त्यांना सातत्याने मदत करीत असतात.
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हेसारख्या कमी पाणी असलेल्या ठिकाणी त्यांचा प्रयोग पाहून तालुक्यातील काही शेतकरीही शेती करण्यास आता सरसावले आहेत. आणि विशेष म्हणजे यात कीटशनाशक फवारणीचीदेखील गरज भासत नाही.शेतीकडे पाठ फिरवणाऱ्या तरुणवर्गासाठी स्वयंपूर्णत: हा व्यवसाय आहे. तालुक्यात हा पहिलाच प्रयोग आहे. केल्याने होत आहे रे.. या उक्तीप्रमाणे गुळवे यांनी ही शेती करून दाखवली आहे. क मी श्रम, कमी मनुष्यबळ; परंतु तितकेच सुंदर असे नियोजन त्यांच्या या रेशीम उद्योगात दिसून येते. त्यांनी केलेली ही शेती अगदी निसर्गरम्य दिसते. तालुक्यातील शाळांनी या परिसरात सहल या ठिकाणी नेल्यास मुले हा रेशीम उद्योग आयुष्यभर विसरणार नाहीत.
शेतीविषयक अभ्यास करून बेलगाव कुऱ्हेसारख्या कमी पाणी असलेल्या ठिकाणी शिक्षक विष्णू बोराडे यांच्या मार्गदर्शनाने सहज विरु ंगळा म्हणून उभा केलेला रेशीम पीक हा नवीन प्रयोग यशस्वी होऊन विक्र मी उत्पादन मिळत आहे.
- राजाराम गुळवे, शेतकरी