रुग्ण विलगीकरणासाठी आश्रमशाळा अधिग्रहित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:15 IST2021-04-11T04:15:01+5:302021-04-11T04:15:01+5:30
आमदार पवार यांनी तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ...

रुग्ण विलगीकरणासाठी आश्रमशाळा अधिग्रहित करा
आमदार पवार यांनी तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी उपस्थित होते. तत्पूर्वी पवार यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालय व ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण केंद्राची पाहणी केली व आरोग्य यंत्रणेसह नागरिकांशी संवाद साधला.
कळवण उपजिल्हा रुग्णालयात आमदार नितीन पवार यांनी कोरोना लस घेऊन लस सुरक्षित असल्याचा विश्वासही यावेळी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, रायुकाँ तालुकाध्यक्ष संदीप वाघ, ओतूरचे सरपंच मंगेश देसाई, दिगंबर पवार, देवा मोरे, शशिकांत बागुल, संदीप पगार, दीपक महाजन, सागर खैरनार आदी उपस्थित होते.