अॅसिड टँकर उलटून गळती
By Admin | Updated: August 20, 2016 00:10 IST2016-08-20T00:06:18+5:302016-08-20T00:10:02+5:30
वनोली : रस्त्यालगत दीड एकर क्षेत्रावरील पीक जळाले

अॅसिड टँकर उलटून गळती
वीरगाव : सटाणा-ताहाराबाद मार्गावर वनोली गावाजवळ फिनाईल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याने चालक व वाहक गंभीर जखमी झाले. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात फिनाईलची गळती झाल्याने यात गोरख बच्छाव या शेतकऱ्याच्या शेतातील सुमारे दीड एकर क्षेत्रावरील तुरीचे पीक पूर्णपणे जळून गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी फिनाईल टॅँकर पलटी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागल्याने परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या गळतीमुळे गोरख बच्छाव या शेतकऱ्याने रस्त्यालगत दीड एकर क्षेत्रात लावलेले तूर पीक पूर्णपणे जळून खाक झाले. यामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला. क्रेनच्या साह्याने टँकर उचलून बाजूला करण्यात आला. (वार्ताहर)