पत्नीचे अश्लील फोटो टाकणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 21, 2014 00:52 IST2014-09-20T20:34:54+5:302014-09-21T00:52:40+5:30
पत्नीचे अश्लील फोटो टाकणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

पत्नीचे अश्लील फोटो टाकणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल
नाशिक : पतीनेच आपल्या पत्नीचे अंघोळीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या पतीवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोतील उत्तमनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे अंघोळ करतेवेळीचे अश्लील फोटो काढले तसेच ते सोशल मीडियावरील ‘व्हॉट्स अॅप’वर अपलोड करून पत्नीची बदनामी केली़
या प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)