कार जळीतप्रकरणी चांगले बंधूंवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 23, 2015 00:14 IST2015-09-23T00:13:41+5:302015-09-23T00:14:06+5:30
कार जळीतप्रकरणी चांगले बंधूंवर गुन्हा दाखल

कार जळीतप्रकरणी चांगले बंधूंवर गुन्हा दाखल
नाशिक : पंचवटीत गँगवारने पुन्हा डोके वर काढले असून एका गटाने दुसऱ्या गटातील एकाची कार जाळल्याची घटना सोमवारी (दि़२१) मध्यरात्री घडली आहे़ या प्रकरणी सराईत गुन्हेगार सुनील व गणेश चांगले बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमानवाडीतील सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी व चांगले गँगमध्ये पूर्ववैमनस्य आहे़ यातूनच संशयित सुनील व गणेश चांगले यांनी सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घरासमोर उभ्या केलेल्या स्विफ्ट कारला (एमएच १५, डीएस ८७९९) आग लावल्याची फिर्याद परदेशीचे वडील सुरेश दगडूसिंग परदेशी (४७, हनुमानवाडी दळवी चाळ, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे़
या आगीमध्ये कारचे टायर व इंजिनचे नुकसान झाले आहे़ पूर्ववैमनस्यातून चांगले बंधूंनीच हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ दरम्यान परदेशी व चांगले गँगमध्ये पूर्ववैमनस्य असून कुरबुरी सुरू झाल्याचे या घटनेवरून समोर आले आहे़ (प्रतिनिधी)