नाशिक : के.के.वाघ महाविद्यालयासमोर दुचाकीस्वार वृद्धास धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या कारचालकाविरोधात पंचवटी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे़ ओझर येथील सीताराम बाबूजी खैरनार (७०) हे दुचाकीने (एमएच १५, एफसी ०७४८) के.के.वाघ महाविद्यालयासमोरील सर्व्हिसरोडने जात होते़ त्यांना संशयित राजेंद्र भारत दुसाने (३५, रा. साईनगर, अमृतधाम) याने आपल्या भरधाव कारने (एमएच ०२, बीएम ०४६८) खैरनार यांच्या दुचाकीस धडक दिली़ यामध्ये गंभीर दुखापत झालेल्या खैरनार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बेकायदा रॉकेल विक्रीभद्रकाली परिसरात विनापरवाना रॉकेल विक्री करणाºया संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ संशयित आझम अलाउद्दीन खलिफा ( ३०, रा. बागवानपुरा) हा विनारपवाना रॉकेल विक्री करीत होता़ त्याच्याकडे रॉकेल विक्री परवान्याबाबत चौकशी केली असता परवाना नसल्याचे समोर आले़ याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़
कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:35 IST