सिने पाठलाग करत आरोपीला केले जेरबंद....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 04:55 PM2020-09-24T16:55:14+5:302020-09-24T16:56:14+5:30

पिंपळगाव बसवंत : शहरातील पवन सूत नगर परिसरातील एक लाख रु पयांची दिवसाढवळ्या धाडसी चोरी करणाऱ्या सराईत कुख्यात चोरट्याचा सिनेपाठलाग करत अटक करण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना काही तासातच यश आले आहे.

Accused arrested while chasing Cine .... | सिने पाठलाग करत आरोपीला केले जेरबंद....

सिने पाठलाग करत आरोपीला केले जेरबंद....

Next
ठळक मुद्देपिंपळगाव पोलिसांनी आवळल्या काही तासातच चोराच्या मुसक्या

पिंपळगाव बसवंत : शहरातील पवन सूत नगर परिसरातील एक लाख रु पयांची दिवसाढवळ्या धाडसी चोरी करणाऱ्या सराईत कुख्यात चोरट्याचा सिनेपाठलाग करत अटक करण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना काही तासातच यश आले आहे.
सचिन साहेबराव रायते (२६) रा. खडकमाळेगाव असे आरोपीचे नाव आहे. आत्तापर्यंत ३० ते ३५ चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या या चोरट्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून ७५ हजार ५०० रु हस्तगत करण्यात आले आहे.
कोरोनामुळे करण्यात आलेले लॉक डाऊन आता हळूहळू शिथील झाले असले तरी अजूनही काही लोक घराबाहेर निघणे टाळतात त्यामुळे या काळात चोरीच्या प्रमाणात देखील घट झाली आहे. मात्र पिंपळगाव बसवंत परिसरातील पवन सूत नगर येथील गवंडी काम करणाºया कुटूंबातील पती गावात तर पत्नी नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्याचा फायदा घेत चोरट्याने एक लाख रु पयांवर डल्ला मारत रोकड चोरून नेली होती. लासलगाव पोलीस ठाण्याचे हवालदार महाजन यांनी दिलेल्या गुप्त माहितीने पिंपळगाव ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंडित वाघ, नितीन जाधव, योगेश बुरंगुले, रवी चिने, रवी झालटे, हवालदार नितीन निंबेकर आदींच्या प्रयत्नाने आरोपीला काहि तासातच बेड्या ठोकत गजाआड केले व त्याकडून ७५ हजार ५०० रु हस्तगत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात चोरी करणारा कुख्यात आरोपी ताब्यात ...
नाशिक जिल्ह्यात ठिकाणी चोरी करणारा सचिन साहेबराव रायते अटक करण्यात पोलिसांसमोर मोठे आव्हान होते पण या चोरट्याने पिंपळगाव शहर परिसरात दिवसाढवळ्या लाख रु पये चोरल्यावर लासलगाव येथील पोलिसांच्या गुप्त माहितीने आरोपीच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा मारला, मात्र तो तिथून पळून जाण्यास यशस्वी झाला. पण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर त्याला पकडले.

Web Title: Accused arrested while chasing Cine ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.