खून प्रकरणी फरार आरोपीस अटक
By Admin | Updated: June 17, 2014 00:13 IST2014-06-16T23:43:46+5:302014-06-17T00:13:49+5:30
खून प्रकरणी फरार आरोपीस अटक

खून प्रकरणी फरार आरोपीस अटक
मालेगाव : कौळाणे येथे झालेल्या खूनप्रकरणातील फरार संशयित आरोपी विजय जगन्नाथ खैरनार यास तालुका पोलिसांनी अटक केली. त्यास १७ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. कौळाणे येथे शेत नांगरण्याच्या वादातून समाधान निंबा शेवाळे या तरूणाचा खून झाला होता. ताईबाई शेवाळे यांनी फिर्याद दिली होती. विजय जगन्नाथ खैरनार व सुरेश जगन्नाथ खैरनार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.