अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप
By Admin | Updated: July 26, 2014 00:55 IST2014-07-25T22:16:20+5:302014-07-26T00:55:17+5:30
दुय्यम निबंधक कार्यालयास ठोकले कुलूप

अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप
लोहोणेर/ेलोहोणेर : येथील दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयास कुलूप ठोकले.
देवळा येथील दुय्यम निबंधक अधिकारी म्हणून गेल्या एक महिन्यापासून एस.के. सुपारे या कामकाज पाहत आहेत. खरेदी-
विक्रीसह विविध कामांसाठी दररोज असंख्य नागरिक दुय्यम निबंधक कार्यालयात येत असतात.
सुपारे यांनी कार्यभार सांभाळल्यापासून ग्राहकाशी, मुद्रांक विक्रेत्यांशी त्यांचा वाद झाला आहे. त्यामुळे अनेक प्रकरणे खोळंबली असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे वैतागून अनेक खरेदीदारांनी आपली कामे बंद केली आहेत.
दरम्यान, नायब तहसीलदार डी. जी. जाधव यांच्या दालनात झालेल्या चर्चेत दुय्यम निबंधक अधिकारी सुपारे यांनी परत असे घडणार नाही, असे सांगून कार्यालयाचे कुलूप उघडण्यास सांगितले. मात्र कुलूप उघडल्यानंतर सदर अधिकाऱ्यांनी पुन्हा अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांची तत्काळ बदली झाली नाही तर दुय्यम निबंधक कार्यालयास कायमचे कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा देवळा बाजार समितीचे माजी सभापती योगेश अहेर यांनी यावेळी दिला. यावेळी पंडितराव निकम, दिलीप पाटील, विठेवाडी विकास सोसायटीचे उपसभापती महेंद्र अहेर, उपसरपंच उद्धव निकम, सचिन सूर्यवंशी आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)