शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेतील आरोपीने खोटे नाव सांगून पोलिसांच्या हातावर दिली तुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:51 IST

धनादेश न वटल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़ के़ दुगावकर यांनी दिलेल्या तीन महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेनंतर अटकेचे समन्स घेऊन पकडण्यासाठी गेलेल्या पंचवटी पोलिसांना आरोपीने खोटे नाव सांगत फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे़

नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़ के़ दुगावकर यांनी दिलेल्या तीन महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेनंतर अटकेचे समन्स घेऊन पकडण्यासाठी गेलेल्या पंचवटी पोलिसांना आरोपीने खोटे नाव सांगत फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे़ अनिल दिलीप अंबरपुरे (२५, रा़ सप्तशृंगी पॅलेससमोर, भगवतीनगर, हिरावाडी, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, तो पेठरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीतील जय मातादी व्हेजिटेबल कंपनीच्या संचालकांचा मुलगा आहे़  कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला व्यवसायिक रघुनाथ वामन येलमामे (रा़श्रीनाथ किराणा, बालाजी चाळ, पेठरोड) व जय माता दी व्हेजीटेबल कंपनीचे संशयित अनिल दिलीप अंबरपुरे यांचे दुकान एकमेकांना लागून आहे़ त्याच्यामध्ये पाच-सहा वर्षांपासून भाजीपाल्याचा व्यापार होत असे़ आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१३ मध्ये कोबी व फ्लॉवर, असा दोन लाखांचा शेतमाल खरेदी केला़ मात्र वारंवार मागणी करूनही अंबरपुरे हे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते़जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एसक़े़दुगावकर यांनी या खटल्यात आरोपी अंबरपुरे यास तीन महिने साधा कारावास व तीन लाख रुपये नुकसानभरपाईसह अदा करण्याचे आदेश दिली़ तसेच रक्कम न भरल्यास आणखी एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली तसेच शिक्षा वॉरंट काढले़पंचवटी पोलीस हे वॉरंट घेऊन अंबरपुरे याच्या घरी जाऊन त्यास नाव विचारले असता त्याने चुकीचे नाव सांगून पलायन केले़ या घटनेमुळे पंचवटी पोलीसही अवाक् झाले असून, आरोपी अनिल अंबरपुरे याचा शोध घेत आहेत़धनादेश न वटल्याने दावाच्अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर अंबरपुरे याने आयसीआयसीआय बँकेचे २२ फेब्रुवारी २०१४ चे ३१०५२ व ३१०५३ असे प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश दिले होते़ मात्र, हे धनादेश बँकेत टाकले असता न वटता परत आल्याने येलमामे यांनी न्यायालयात दावा केला होता़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी