आरोपींना कोठडी
By Admin | Updated: September 11, 2014 00:01 IST2014-09-10T22:25:26+5:302014-09-11T00:01:19+5:30
आरोपींना कोठडी

आरोपींना कोठडी
मनमाड : येथील इदगाह विभागात हाणामारी होऊन एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकूण ११ जणांना अटक केली आहे. त्यांना मनमाड न्यायालयासमोर उभे केले असता ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या घटनेमुळे इदगाह भागात मात्र तणावपूर्ण शांतता आहे. ऐन गणेशोत्सवात हा प्रकार घडल्याने विसर्जन मिरवणुकीवर या घटनेचे सावट होते. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त, एसआरपीची कुमक व दंगानियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. या दुर्दैवी घटनेत राहुल कन्हय्यालाल चुनियान (१७) याचा मृत्यू झाला.