शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बनावट दावे दाखल करून लेखापालाने आयकर विभागाला १७ कोटींना फसविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 06:40 IST

मोठ्या कंपन्यांसह निमसरकारी कर्मचाऱ्यांचे दिले स्वतंत्र विवरणपत्र

नाशिक : एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने एचएएलसह विविध बड्या कंपन्या व निमसरकारी विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाऱ्यांचे मागील चार वर्षांचे आयकर विवरणपत्र स्वतंत्रपणे तयार करून ते दाखल करत, आॅनलाइन दाव्यांमार्फत कर्मचाºयांच्या नावाने आयकर विभागासह सरकारची सुमारे १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयित किशोर राजेंद्र पाटील विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पाटील याने २०१६ ते २०१९ पर्यंत महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा, बॉश, सिएट, सीएनपी-आयएसपी, एमएसईबी, ग्राफाईट, गायत्री पेपर, एचएएलसह एकूण १० कंपन्या व निमशासकीय विभागातील १,८८८ कर्मचाºयांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे आयकर विभागाला आढळले आहे.पाटीलने कर्मचाºयांचे स्वतंत्ररीत्या आयकर विवरणपत्रांद्वारे दावे दाखल करताना विवरणपत्रांमध्ये गृह संपत्तीपासून नुकसान व विविध आयकर कलमांखाली बनावट कपात दाखवून कर्मचाºयांच्या नावे १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपये मूळ परतावा व्याजासह घेतला व कर्मचाºयांकडून शुल्कापोटी परताव्याच्या २० टक्के रक्कमही हडप केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पाटीलने ज्यांचे विवरणपत्र तयार केले, त्यांच्यापैकी २०० जणांचे जबाब आयकर विभागाने नोंदविले आहेत. बनावट दावे केलेल्यांना आयकर खात्याने पैसे परत करण्याचे सांगितले होते. त्यानुसार, ५७३ कर्मचाºयांनी मिळालेला परतावा व्याजासह परत केला. यातून ११ कोटी ५७ लाख रुपये सरकारजमा झाले आहेत.पाटीलच्या कार्यालयाची झाडाझडतीआयकर अधिकारी धनराज बोराडे यांच्या पथकाने पाटीलच्या कार्यालयाची झडती घेतली. कागदपत्रे ताब्यात घेतली. काही कर्मचाºयांच्या वेतनातही पाटीलने फेरफार केल्याचे यावेळी समोर आले.

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी