पाथर्डी परिसरात घडतात रोजच अपघात
By Admin | Updated: April 3, 2017 01:30 IST2017-04-03T01:30:34+5:302017-04-03T01:30:47+5:30
पाथर्डी फाटा : प्रभाग क्रमांक ३१ मधील संपूर्ण पाथर्डी फाटा परिसरातील विविध रस्त्यांवर होणारे अपघात लक्षात घेता ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पाथर्डी परिसरात घडतात रोजच अपघात
पाथर्डी फाटा : प्रभाग क्रमांक ३१ मधील संपूर्ण पाथर्डी फाटा परिसरातील विविध रस्त्यांवर होणारे अपघात लक्षात घेता ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांत रस्त्यांची
दुरुस्ती होऊन ते मोठे झाल्याने वाहन सुसाट वेगाने धावू लागल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये कुंभमेळ्याच्या निधीतून व अन्य तरतुदींमधून मुख्य रस्त्यांची व कॉलनी रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पाथर्डी फाटा ते वडनेर गेट, पाथर्डी गाव ते कलानगर, हॉटेल एक्स्प्रेस इन ते पाथर्डी रस्ता, शरयू नागरी ते वासननगर अशा विविध रस्त्यांचे रुंदीकरण व दुरुस्ती झाली आहे. त्यामुळे सर्व रस्त्यांवर दिवसभर वाहतूक असते.
हे सर्व रस्ते चांगले व मोठे झाल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अपघातही वाढले आहेत. बऱ्याच घटना पोलीस ठाण्यापर्यंत जात नसल्या तरी अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे पाथर्डी फाटा ते वडनेर गेट दरम्यान मुरलीधरनगरचा भाजीबाजार हॉटेल पामसमोर, हॉटेल नैवेद्यमजवळील चौफुली, निसर्ग कॉलनीचा रस्ता, पाथर्डी गाव वाहतूक बेटाच्या चारही बाजू, एकतानगर, पिंपळगाव खांब फाटा अशा ठिकाणी गतिरोधकांची आवश्यकता आहे. या रस्त्यावर दुभाजकदेखील आवश्यक असल्याचे नागरिक सांगतात. पाथर्डी गाव ते इंदिरानगर दरम्यान, शरयू नागरी चौफुली, गुरूगोविंदसिंग स्कूल व कॉलेजसमोर गतिरोधकांची गरज आहे.
याशिवाय हॉटेल एक्स्प्रेस इन ते पाथर्डी रस्ता दरम्यान आई आश्रम स्वीटजवळ, दामोदरनगर चौफुली, अंजना लॉन्स येथे गतिरोधकांची आवश्यकता आहे. वासननगरच्या काही कॉलनी रस्त्यांवरही गतिरोधकांची आवश्यकता असल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. ही सर्व ठिकाणे अपघातप्रवण सिद्ध होऊ लागली असून, मोठ्या अपघातांची वाट न पाहता मनपा प्रशासनाने गतिरोधक टाकावेत, अशी मागणी रवि गायकवाड, अंकुश भोर, प्रकाश जाधव, राहुल निकुंभ, दीपक जाधव आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)