आडगाव येथे अपघात; हॉटेल चालकाचा मृत्यू
By Admin | Updated: April 2, 2017 00:58 IST2017-04-02T00:58:16+5:302017-04-02T00:58:40+5:30
चांदवड: तालुक्यातील आडगावटप्पा येथे रस्ता ओलांडणाऱ्या स्विफ्ट कारला चांदवडकडून येणाऱ्या तवेराने धडक दिल्यानेझालेल्या अपघातात मंगरूळ येथील हॉटेल मालक प्रदीप भीमराव ढोमसे जागीच ठार झाले़

आडगाव येथे अपघात; हॉटेल चालकाचा मृत्यू
चांदवड: तालुक्यातील आडगावटप्पा येथे रस्ता ओलांडणाऱ्या स्विफ्ट कारला चांदवडकडून येणाऱ्या तवेराने धडक दिल्याने
झालेल्या अपघातात मंगरूळ येथील हॉटेल मालक प्रदीप भीमराव ढोमसे जागीच ठार झाले़ त्यांच्या समवेत असलेले दोनजण गंभीर जखमी झाले आहेत, तर तवेरामधील सात-आठ जण जखमी झाले.
शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आडगाव येथील हॉटेलचे मालक प्रदीप ढोमसे हे आपली स्वीफ्ट कारने (क्र. एमएच १५ सीवाय ९३३३) वेटर संदीप नामदेव पूरकर (३८, रा. आडगाव) व राजेशकुमार शाहू (२६, रा. मध्य प्रदेश) यांच्या समवेत भाजीपाला आणण्यासाठी चांदवड येथे येत होते. याच सुमारास चांदवडकडून नाशिककडे जाणाऱ्या तवेराने (क्र. एमएच ४ ईएफ १९५५) रस्ता ओलांडणाऱ्या स्वीफ्ट कारला जोरात धडक दिली यात प्रदीप ढोमसे हे जागीच ठार झाले. संदीप पूरकर व राजेशकुमार शाहू दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (वार्ताहर)