शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नाशकातील दोघांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 17:10 IST

मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपुर्वीच अझहरने अ‍ॅक्टीवा दुचाकी खरेदी केली होती. मलंग डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते

नाशिक : ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले. नाईकवाडीपुरा येथील सय्यद कुटुंबीयांनी एकुलता एक मुलगा अझहरला या अपघातात गमावले तर काजीगढीवरील बागवान कुटुंबातील हाजी मलंग हा घराचा कर्ता पुरूष हरपला. या अपघाताची बातमी रात्री जुन्या नाशकात येताच संपुर्ण जुने नाशिक भागात शोककळा पसरली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, ओझरकडून शुक्रवारी (दि.२०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिककडे अ‍ॅक्टिवा दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हाजी मलंग बागवान (४०,रा काजी गढी), अझहर इलियास सय्यद (२७,रा. नाईकवाडीपुरा) या दोघांचा मृत्यू झाला. पाठीमागून भरधाव जाणाऱ्या वाहनाने अझहर व मलंग या दोघांना चिरडले. अझहर चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मलंग यांचा उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने संपुर्ण जुन्या नाशकात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपुर्वीच अझहरने अ‍ॅक्टीवा दुचाकी खरेदी केली होती. अद्यापपर्यंत दुचाकीला क्रमांकदेखील आरटीओकडून मिळालेला नाही. तत्पुर्वीच काळाने या दोघांवर घाला घातला. मलंग डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरिक्षक संजय बिडगर हे करीत आहेत. बागवान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातDeathमृत्यू