दिंडोरी : तालुक्यातील जवळके दिंडोरी दौलत कॉलनी येथील रहिवासी व एचएएलचे सेवानिवृत्त अधिकारी भास्कर यशवंत कमोद (७०) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मॉर्निंग वॉकला गेलेल्या कमोद यांना दुचाकीने धडक दिली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. जैन इरिगेशनचे अधिकारी रवि कमोद यांचे ते वडील होत.
अपघातग्रस्त वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:06 IST