शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 01:13 IST

तारवालानगरकडून अमृतधामकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हिरावाडीतील गुंजाळबाबानगर विहान हॉटेलजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आडगाव शिवारात राहणारा दुचाकीस्वार दीपक विलास चव्हाण (४५) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.

पंचवटी : तारवालानगरकडून अमृतधामकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हिरावाडीतील गुंजाळबाबानगर विहान हॉटेलजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आडगाव शिवारात राहणारा दुचाकीस्वार दीपक विलास चव्हाण (४५) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नांदेड जिल्ह्यातील कंटेनर चालकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत विल्लोळी येथे राहणाऱ्या मंगेश सुभाष दांडगे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काल मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला आडगाव शरयू पार्क येथे राहणारे दीपक चव्हाण हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (क्रमांक एमएच१५ एफएच ०२५६) तारवालानगरकडून अमृतधाम बाजूकडे जात असताना विहान हॉटेलजवळ पुलावर कंटेनरने (क्रमांक डी.एन ९० आर ९७९९) समोरून त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात चव्हाण यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताच्या घटनेनंतर कंटेनर चालकाने घटनास्थळाहून पलायन केले.
टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू