बनावट परवान्यांमुळेच अपघातांत वाढ

By Admin | Updated: June 11, 2015 23:53 IST2015-06-11T23:52:18+5:302015-06-11T23:53:18+5:30

नितीन गडकरी : स्वयंचलित वाहन चाचणी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Accidental accidents caused by fake licenses | बनावट परवान्यांमुळेच अपघातांत वाढ

बनावट परवान्यांमुळेच अपघातांत वाढ

पंचवटी : देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात आणि दीड लाख नागरिकांना जीव गमवावा लागतो. त्याचे कारण म्हणजे देशात २२ टक्के बनावट लायसन्स (चालक परवाने) दिले जात असून, परीक्षा न देताच चिरीमिरी देऊन हे लायसन्स मिळतात. परिणामी अपघातांत वाढ होत असल्याचे सांगत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचारावरच बोट ठेवले.
नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात राज्यातील पहिली स्वयंचलित वाहन चाचणी आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Accidental accidents caused by fake licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.