शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात; दोन गाई ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:40 IST

कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करणाºया पिकअप वाहनाचे मागचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोन गाई ठार झाल्या, तर बाकीची जनावरे जखमी झाले आहेत. डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे (ता. बागलाण) गावाजवळ मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

कंधाणे : कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करणाºया पिकअप वाहनाचे मागचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोन गाई ठार झाल्या, तर बाकीची जनावरे जखमी झाले आहेत. डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे (ता. बागलाण) गावाजवळ मंगळवारी पहाटे ही घटना घडली.अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार झाला. परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनातून जनावरांची सुटका करत चारापाण्याची सोय करून देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. पहाटे पिकअप वाहनातून (क्र . एमएच ४१ जी ३०१६) कत्तलीसाठी अवैध मार्गने चौदा गाई वाहून नेत असताना चौंधाणे गावाजवळ वाहनाचे मागचे टायर फुटल्याने दोन गाई ठार झाल्या, तर इतर जनावरे जखमी झाले.अपघातानंतर चालक वाहन सोडून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक निरभवणे, नीलेश पवार, बहिरम घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ठार झालेल्या गार्इंची उत्तरीय तपासणी करण्यात आली. जखमी जनावरांवर उपचार करून त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. येथील उपसरपंच रवींद्र मोरे, माजी सरपंच राकेश मोरे, पुंजाराम मोरे यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनातून या जनावरांची सुटका केली. अधिक तपास सटाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस नाईक नीलेश पवार, निरभवणे, बहिरम करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात