कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनास अपघात

By Admin | Updated: December 14, 2015 23:52 IST2015-12-14T23:52:31+5:302015-12-14T23:52:32+5:30

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनास अपघात

Accident of the vehicle carrying slaughtered animals | कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनास अपघात

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनास अपघात

पंचवटी : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकास थांबण्याचा इशारा देऊनही पलायनाच्या नादात झाडावर वाहन आदळून अपघात झाल्याची घटना शनिवारी (दि़१२) रात्री सव्वातीन वाजेच्या सुमारास पेठरोडवर घडली़ या प्रकरणी संशयित चाँद मुश्ताक शेख व अश्पाक उस्मान शेख या दोघांवर पंचवटी पोेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़
सामाजिक कार्यकर्ते विजय मोहिते यांना पेठरोडने एका बोलेरो पिकअप वाहनातून (एमएच १६, एई ८६५०) कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून विजय मोहिते, नरेश पवार, देवीदास परदेशी, नरेश भोगे, योगेश मोहिते हे हॉटेल राऊजवळ गेले असता त्यांना सदर वाहन जाताना दिसले़ या वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने भरधाव वाहन नेले व एसटीच्या वर्कशॉपजवळील झाडाला जाऊन आदळले.या वाहनामध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणारे एक जनावर बांधलेले आढळून आले, तर यातील संशयित चाँद व अश्पाक शेख हे दोघे पळून जाण्याच्या तयारीत होते़ या दोघांनाही मोहिते यांनी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले़ पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Accident of the vehicle carrying slaughtered animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.