शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वणी-नाशिक रस्त्यावरील अपघाताचे सत्र सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:50 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील वणी ते नाशिक हा दुय्यम दर्जाचा महामार्ग प्रवासी वर्गासाठी दिवसेंदिवस डोकेदुखीचा विषय बनत चालला आहे. सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे कानाडोळा यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघातांची शृंखला केव्हा खंडित होणार, असा सवाल प्रवासी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

वणी ते नाशिक हा रस्ता दळणवळणाच्या माध्यमातून महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्याने गुजरात जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या कंपन्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक या रस्त्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर होत असते. तसेच दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, नाशिक आदी तालुक्यातील भाजीपाला सुरतच्या बाजारपेठेत याच रस्त्याने नेला जातो. तसेच कंपन्यामध्ये तयार झालेल्या पक्क्या मालाची निर्यातदेखील याच रस्त्याने होते. त्यामुळे हा रस्ता दळणवळणांच्या माध्यमातून महत्त्वाचा मानला जातो. व वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत असते. गुजरातहून जास्त भाविक शिर्डी येथे याच रस्त्याने प्रवास करीत असतात. तसेच सापुतारा हे पर्यटन क्षेत्र पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील प्रवासी या रस्त्याने ये-जा करीत असतात. महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी गड याच महामार्गावर येत असल्यामुळे देशातील अनेक भागातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हा रस्ता सर्व बाजूने महत्त्वाचा मानला गेला आहे; परंतु या रस्त्याने प्रवास करताना प्रवासी वर्गाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या रस्त्याची आता नव्याने दुरुस्ती करण्यात आल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या रस्त्यावरील अपघातात काही जणांना प्राणाला मुकावे लागले आहे, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे. सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे कानाडोळा या गोष्टी वाढत्या अपघातांना कारणीभूत असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी वळण रस्ता आहे. या वळणांवर सूचना देणारे फलक नाहीत. त्यामुळे वाहनधारकाला रस्त्यांचा अंदाज कळत नाही. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी वळण आहे, त्या ठिकाणी तसेच वेगवेगळ्या फाट्यावर दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात