गुजरातच्या शेतमजुरांच्या वाहनाला कळवणजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:53+5:302021-09-26T04:16:53+5:30
कळवण : तालुक्यातील हिंगळवाडी शिवारात शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतमजुरांच्या वाहनाला अपघात होऊन बारा शेतमजूर जखमी झाले. त्यापैकी ...

गुजरातच्या शेतमजुरांच्या वाहनाला कळवणजवळ अपघात
कळवण : तालुक्यातील हिंगळवाडी शिवारात शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतमजुरांच्या वाहनाला अपघात होऊन बारा शेतमजूर जखमी झाले. त्यापैकी रेशमा गवळी (४०) गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अभोणा पोलीस ठाण्यात मोटर अपघात गुन्हा नोंद झाल्याबाबत चौकशी केली असता सायंकाळी उशिरापर्यंत आमच्याकडे काही एक माहिती आलेली नाही.
कळवण तालुक्यात शेतीच्या व कांदा व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पश्चिम भागातून तसेच गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या गावातून शेतमजूर कामासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे जाखाना व कोटमदर (गुजरात) या गावातील शेतमजूर आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील हिंगळवाडी शिवारातून वाहन क्रमांक जि जे १७ सी ६८०२ हे कामाच्या ठिकाणी जात असताना वळण रस्त्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी होऊन बारा शेतमजूर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी रेशमा शंकर गवळी (४०, रा जाखाना) या गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. जखमींवर कळवण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव, हेमंत पवार, अधिपरिचारिक वर्षा रौंदळ, शिपाई राकेश वळवी आदींनी तातडीने उपचार केले.
-----------------------
जखमींचे नावे
रेशमा शंकर गवळी, (४०), विमल रामदास पवार (४९), ढवळू रतन गवळी (५१, सर्व रा.जाखाना, गुजरात विठा) वामन पवार (३१), उलू यशवंत महाले (३०), कला पांडुरंग पिठे (४५), काशा हरी वाघमारे (५०), झुरकाबेन काशा वाघमारे (४५), बेबी देवराम वाघमारे (५०), रंगली रणजित पवार (३०), राजेश आनंदा महाले (३०), सुरेश वाळ्या बागुल (३०, रा. कोटमदर, गुजरात) आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.
----------------------------
(२५ कळवण ॲक्सिडेंट १/२)
250921\25nsk_42_25092021_13.jpg~250921\25nsk_43_25092021_13.jpg
२५ कळवण ॲक्सीडेंट १~२५ कळवण ॲक्सीडेंट २