शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

चेहेडीजवळ अपघात; दोघा मित्रांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 01:29 IST

चेहेडी पंपिंगजवळ आरंभ महाविद्यालयातील तिघा विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात घडला. त्यातील दोघे विद्यार्थी ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले आहे. ऐन व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन दिवसांनी साखरपुडा होणार असल्याने विवाहाची स्वप्ने बघणाऱ्या आकाश गवळीचा या अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने आयुष्याची साथीदारासोबत सुरुवात होण्यापूर्वीच अर्ध्यावरती डाव मोडला.

ठळक मुद्देहात पिवळे होण्याआधीच एकाचा करूण अंत

नाशिकरोड : चेहेडी पंपिंगजवळ आरंभ महाविद्यालयातील तिघा विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात घडला. त्यातील दोघे विद्यार्थी ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले आहे. ऐन व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन दिवसांनी साखरपुडा होणार असल्याने विवाहाची स्वप्ने बघणाऱ्या आकाश गवळीचा या अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने आयुष्याची साथीदारासोबत सुरुवात होण्यापूर्वीच अर्ध्यावरती डाव मोडला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील तिसरा विद्यार्थी जखमी आहे. या घटनेमुळे चेहेडी पंपिंग विजयनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.साखरपुड्यापूर्वीचा आकाशचा करूण अंतअपघातात मृत्यू झालेला आकाश गवळी याचा दोन दिवसांनी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवतअसताना हात पिवळे होण्यापूर्वीच अपघातात आकाशचे दुर्दैवी निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, विजयनगर येथील आदर्श रोहिदास कराड (१८), आकाश राजू गवळी (१८), ज्ञानेश्वर बाळू केदारे (१८) हे तिघे मित्र आरंभ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास हे तिघे विद्यार्थी मित्र दुचाकीवरून विजयनगर येथे घरी जात होते. त्यावेळी मातीने भरलेल्या ट्रकच्या चालकाने भरधाव वेगाने जात दुचाकीला धडक दिली. यामध्ये आदर्श कराड, आकाश गवळी हे दोघे हायवा ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले व ज्ञानेश्वर केदारे हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे.दोघा विद्यार्थ्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू