शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Accident: मालेगावच्या वऱ्हाडाच्या बसला अपघात; वृद्धेसह तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:01 IST

Accident: लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला भडगाव ता.(साक्री) बारीत अपघात झाला या भीषण अपघातात वृद्धेसह एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुमारे १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

- अतुल शेवाळे

मालेगाव (नाशिक) -  तालुक्यातील चिंचवे(गा) येथून साक्री येथे लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला भडगाव ता.(साक्री) बारीत अपघात झाला या भीषण अपघातात वृद्धेसह एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुमारे १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृत व जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. चिंचवे(गा) येथील संदीप बाळू साळवे यांच्या मुलीचे साक्री येथे लग्न होते. वऱ्हाड सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास साक्री कडे रवाना झाले होते. भडगावबारीत चालक दीपक आहिरे याचे स्कूल बस क्रमांक एम एच ४१एबी ९८०५ वरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात मकुबाई बारकू ह्यालीज(६०) रा. करजगव्हाण व मयुरी विकास बोरसे (१२) रा शिर्डी यांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ ते २९ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही गंभीरित्या जखमी झालेल्या वऱ्हाडीना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वऱ्हाडी मंडळीने तातडीने जखमी व मृतांना सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. या अपघातात मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक