रामवाडी परिसरात अपघातांत वाढ; वाहनांची वर्दळ वाढली
By Admin | Updated: August 10, 2015 23:23 IST2015-08-10T23:22:46+5:302015-08-10T23:23:21+5:30
रामवाडी परिसरात अपघातांत वाढ; वाहनांची वर्दळ वाढली

रामवाडी परिसरात अपघातांत वाढ; वाहनांची वर्दळ वाढली
पंचवटी : येथील रामवाडीतील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढत चालल्याने दिवसेंदिवस अपघातांत वाढ झाली आहे. अपघात वाढल्याने परिसरातील मुख्य रस्त्यावर गतिरोधक टाकावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गतिरोधक टाकण्याबाबत शहर वाहतूक पोलीस शाखेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांनीही रस्त्याची पाहणी करून गतिरोधक टाकण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले आहे. मात्र मनपा प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली गेलेली नसल्याने परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करूनही प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कौशल्यानगर, आदर्शनगर, रामवाडी, पाटील चाळ, बायजाबाईची छावणी रस्त्यावर गतिरोधक टाकावेत, अशी मागणी माजी नगरसेवक संजय बागुल, आदिंसह परिसरातील नागरिकांनी पत्रकान्वये केली आहे. (वार्ताहर)