नाशिक :आयशर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकावरून आयशर विरु द्ध दिशेच्या मार्गावरील वाहनावर आदळून झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२४) घडली. शिरवाडे फाट्यावरील दौलत हॉटेलजवळ हा भीषण अपघात झाला.या अपघातात निवृत्ती रामभाऊ लोंढे, सुशिला सुनील गवळी, शोभा जगन्नाथ्ृ सुर्यवंशी आणि सुदाम पाटणकर या चौघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच १६ क्यू ३५७०ही आयशर गाडी सुनील दिगंबर पगारे (रा. गांधीनगर, नाशिक) चालवत होते. ते नाशिकहून वडाळीभोईच्या दिशेने जात होते. त्यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आयशर रस्ता दुभाजकावरून विरु द्ध दिशेला गेली. त्याचवेळी मालेगावहून नाशिकच्या दिशेने एमपी०९ जीई २०२८ क्र मांकाचे वाहन आण िआयशर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या धडकेत आयशरमधील ४० प्रवाशांपैकी तीघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रु ग्णालयात नेताना मृत्यू झाला. आयशरमधील सहा मिहन्यांच्या चिमुकलीसोबत तीन महिला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ३५ जणांवर खासगी आण िशासकीय रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये११ महिलांसह ६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:34 IST
नाशिक : आयशर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकावरून आयशर विरु द्ध दिशेच्या मार्गावरील वाहनावर आदळून झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२४) घडली. शिरवाडे फाट्यावरील दौलत हॉटेलजवळ हा भीषण अपघात झाला.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात
ठळक मुद्दे या धडकेत आयशरमधील ४० प्रवाशांपैकी तीघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रु ग्णालयात नेताना मृत्यू झाला. आयशरमधील सहा मिहन्यांच्या चिमुकलीसोबत तीन महिला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला.