देवळा-कळवण रस्त्यावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:46+5:302021-09-04T04:19:46+5:30
देवळा-कळवण रस्त्यावर देवळा बाजार समितीचे आवार असल्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर काही ठिकाणी ...

देवळा-कळवण रस्त्यावर अपघात
देवळा-कळवण रस्त्यावर देवळा बाजार समितीचे आवार असल्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवीत वाहनधारकांना या रस्त्याने मार्ग काढावा लागतो. शुक्रवारी (दि. ३) रात्री ९ वाजेच्या सुमारास रामराव हौसिंग सोसायटी परिसरात देवळा शहराकडून कळवणकडे जाणारी पिकअप गाडी (क्र. एमएच ४१ जी १७०) व मटाणे येथील भाजीपाल्याची वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. एमएच १५ ७२६१) यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. धडक इतकी जोरदार होती की, ट्रॅक्टरचे तुकडे झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
फोटो - ०३ देवळा १
पिकअपच्या धडकेने ट्रॅक्टरचे झालेले नुकसान.
030921\03nsk_37_03092021_13.jpg
पिकअपच्या धडकेने ट्रॅक्टरचे झालेले नुकसान.