घोटी-सिन्नर रस्त्यावर अपघात दांपत्य ठार
By Admin | Updated: April 2, 2016 23:14 IST2016-04-02T23:14:10+5:302016-04-02T23:14:45+5:30
घोटी-सिन्नर रस्त्यावर अपघात दांपत्य ठार

घोटी-सिन्नर रस्त्यावर अपघात दांपत्य ठार
घोटी : घोटी-सिन्नर रस्त्यावर उभाडे शिवारात शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शिर्डीहून घोटीकडे जाणाऱ्या स्विफ्ट वाहनाला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. तर या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून, पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिर्डी येथून साईदर्शन घेऊन मुंबईकडे परतणाऱ्या (एमएच ०४, एफझेड ८१४४) या स्विफ्ट वाहनास घोटीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या (सीजी ०४ झेडई ९९६९) या ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने स्विफ्ट वाहनातील संजीव टंडन व त्यांची पत्नी सारिका संजीव टंडन हे ठार झाले.
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की या ट्रकखाली स्विफ्ट वाहन पूर्णपणे घुसल्याने स्विफ्ट वाहन पूर्णपणे गोळा झाले.
अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून, रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल
करण्यात आला नव्हता. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)