शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Accident: मालेगावजवळ भाविकांच्या टेम्पोला अपघात, सहा जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 22:36 IST

Accident News: मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविकांच्या टेम्पोला परत जाताना गिगाव फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाले असून ४ जण जखमी झाले आहेत.

नाशिक - मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविकांच्या टेम्पोला परत जाताना गिगाव फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाले असून ४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर अपघात रविवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविक मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. खंडेराव महाराजांचे दर्शन व गोंधळाचा कार्यक्रम आटोपून भाविक पुन्हा आपल्या गावाकडे निघाले होते. गिगाव फाट्यावर आल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या पिकअप आणि टेम्पोत जोरदार धडक झाली. यात टेम्पो पलटी झाला. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना टेम्पोतून बाहेर काढून तालुका पोलिसांना याची खबर दिली. तात्काळ घटनास्थळी पोलिसांसह रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक