नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत वगळता परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने या भागात राजकीय वातावरण तापू लागले आहेत. परिसरातील दोडी बुद्रुक, भोजापूर खोरे परिसर, दापूर, दातली, मानोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ आदी मोठ्या ग्रामपंचायतीत रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यामुळे पॅनल निर्मितीला वेग आला आहे. भाऊबंदकी व वाड्यावाड्यातून कोणी उमेदवारी करायची याबाबत गटागटात बैठका सुरु झाल्या आहेत. इच्छूक उमेदवारांची कागदपत्रांसाठी धावपळ सुरु असून अनेक उमेदवार ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संगणक केंद्रावर गर्दी करताना दिसून येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन दिवस सुट्टी असल्याने शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची चिन्हे आहेत. दोडी, दापूर, चास, नळवाडी, खंबाळे, निऱ्हाळे आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका अटीतटीच्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नांदूरशिंगोटे परिसरात पॅनल निर्मितीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:56 IST